कोरोनामुळे गेल्या एप्रील महिन्यापासून महाविद्यालये बंद आहेत. परंतू आता कोरोना प्रसाराचा वेग कमी होत असतांना आणि प्रतिबंधात्मक लस ऊपलब्ध झाली असतांना महिविद्यालये पुन्हा सुरु करण्यात यावे अशी मागणी विद्यार्थी संघटनांकडून होते आहे. यावर महाविद्यालये सुरु करण्याबाबतचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे, येत्या ५ ते ७ दिवसांत महाविद्यालये सुरु करण्याची तारीख जाहीर करु असे राज्याचे ऊच्च व तंत्रशिक्षण मंत्री ऊदय सामंत यांनी म्हटले आहे.
नुकत्याच पार पडलेल्या राज्यातील सर्व कुलगुरुंसोबत पार पडलेल्या बेठकीनंतर ते बोलत होते. महाविद्यालये सुरु करण्याबाबत विद्यापिठांचे कुलगुरु सकारात्मक आहेत. मात्र विद्यापिठे सुरु करत असतांना एसअोपी निर्माण कराचा लागतो आणि त्यावर वेगाने काम सुरु आहे. त्यामुळे काही दिवसांतच महाविद्यालये पुन्हा सुरळीत सुरु झाल्याचे आम्ही जाहीर करणार आहोत, असे ऊदय सामंत यांनी सांगीतले.
यादरम्यानच वस्तीगृहसुद्धा सुरु करण्याची मागणी विद्यार्थीसंघटनांकडून होते आहे. यावरदेखील ऊदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. अनेकठिकाणी वस्तीगृहांना क्वारंटाईन सेंटर करण्यात आले होते. आता क्वारंटाईन सेंटरची संख्या घटली आहे. त्यामुळे लवकरच वस्तीगृहे महाविद्यालयांकडे सुपुर्द करण्यात येतील. अगोदर डिजास्टर मॅनेजमेंटसोबत मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडेल आणि त्यानंतर लगेच कॉलेज सुरु करण्यात येतील. १०० टक्के उपस्थितीत कॉलेज सुरु करण्याचा निर्णय शासन घेणार नाही. एसअोपी ठरवून विद्यार्थ्यांची उपस्थिती बघून टप्याटप्याने कॉलेज सुरु करण्यात येतील अशी माहिती ऊदय सामंत यांनी दिली.