आ. लंकेच्या कोविड सेंटरला गुजरातच्या आयपीएस अधिकाऱ्याने दिली ५१ हजार रुपये देणगी

8


राष्ट्रवादीचे पारनेर येथील लोकप्रिय आमदार निलेश लंके यांनी मतदारसंघातील भाळवणी गावात शरदचंद्र पवार आरोग्य मंदिर नावाने तब्बल एक हजार शंभर बेडचे कोविड सेंटर सुरू केले आहे.

तालुक्यातील सर्व कोरोना रुग्णांना या कोविड सेंटरचा लाभ होत आहे. यासाठी सर्व स्तरांतून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. पैसे, धान्य, औषधे इत्यादींच्या स्वरूपात अनेकांनी मदत केल्याचं लंके यांनी सांगितलं आहे

सुरत जिल्ह्यात उपायुक्त म्हणून कार्यरत असणारे प्रशांत सुंबे यांनीही कोविड सेंटरची माहिती मिळाल्यानंतर आमदार निलेश लंके यांच्याशी संपर्क करून ५१ हजार रुपये देणगी सुपुर्द केली आहे. पाडळी तर्फे कान्हुर ता. पारनेर येथील रहिवासी असलेले प्रशांत सुंबे हे गुजरात राज्यातील सुरत जिल्ह्यात उपायुक्त पदावर कार्यरत आहेत.

आयपीएस अधिकारी असलेल्या प्रशांत सुंबे यांनी आमदार  लंके यांनी सुरू केलेल्या कोविड सेंटर ला ५१ हजार रूपयांची देणगी देऊन आपली नाळ जन्मभूमीसोबत जोडलेली असल्याचं सिद्ध केलं आहे. अनेकांनी देणगी स्वरुपात कोविड सेंटरला मदत केली आहे.