आ. निलेश लंके यांना अडीच किलो चांदीची गदा; तसेच एक लक्ष रुपयांचा कोरोना केसरी पुरस्कार

42

राष्ट्रवादीचे लोकप्रिय आमदार निलेश लंके यांना हिंदकेसरी पै.संतोष वेताळ फाऊंडेशन कोल्हापूरकर यांच्या वतीने कोरोना केसरी किताबाने सन्मानित करण्यात आले आहे. अडीच किलो चांदीची गदा व कोरोना केसरी सन्मानपत्र व रक्कम एक लक्ष रुपयांचा धनादेश देऊन त्यांना गौरविण्यात आले.

कोरोनाच्या जागतिक महामारीच्या काळामध्ये माझ्या सर्व सहकारी मित्रांनी कोविड सेंटर उभारणीत ज्या सर्वांनी मोलाची कामगिरी बजावली या सर्वांचा हा बहुमान आहे असे मी समजतो ! अशा शब्दात लंके यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

प्रत्येकाने आपले सेवाकार्य मानवतेच्या दृष्टीने करणे हे एक लोकप्रतिनिधी म्हणून माझं आध्य कर्तव्य मी समजतो. मी स्वतः मैदानांत उतरून आपल्या लोकांसाठी कोरोनाशी दोन हात करत आहे. परंतु यात माझ्या सर्व सहकारी मित्राचा सिंहाचा वाटा आहे. असेही लंके म्हणाले.

हिंदकेसरी फाउंडेशन सुर्ली, कराड च्या वतीने हिंदकेसरी मा.पै.संतोष वेताळ (आबा) यांच्या हस्ते कोरोना केसरी हा किताब लंके यांना देण्यात आला. हा संपूर्ण ‘किताब मी माझ्या मतदार संघातील माझ्या माय-बाप जनतेला समर्पित करतो असेही लंके यांनी म्हटले आहे.