अत्यावश्यक काम असेल तरच विद्यापीठात यावे : पुणे विद्यापीठ प्रशासन

10

अत्यावश्यक काम असेल तरच विद्यापीठात यावे अशा सूचना विद्यापीठ प्रशासाने दिल्या आहेत.कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने पुणे शहरात निर्बंध आणले आहेत.

पुणे विद्यापीठात शैक्षणिक व प्रशासकीय कामानिमित्त पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यातून संस्थांचे प्रतिनिधी, प्राध्यापक, विद्यार्थी येत असतो. त्यामुळे कार्यालयात गर्दी होत आहे. 

कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार म्हणाले, पुण्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने विद्यापीठानेही खबरदारी घेण्यास सुरूवात केली आहे. शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांच्या व्यतिरिक्‍त बाहेरील व्यक्‍तींना विद्यापीठात प्रवेश दिला जाणार नाही. शैक्षणिक संस्थांनी त्यांची कामे ऑनलाईन व फोनवरून करून घ्यावीत. 

विद्यापीठातील कार्यालयांमध्ये देखील नियमांचे पालन करून कामकाज व्हावे याकडे लक्ष आहे. सर्व प्रशासकीय व शैक्षणिक विभाग सॅनिटायझर पूर्ण झाले असून, परीक्षा विभाग वगळता इतर विभागात सायंकाळी सहा नंतर काम बंद होईल.