कोरोना लढाईत राजकारण न आणता एकत्र येऊन लढा : आयुक्त कैलास जाधव 

4

नाशिक शहरात कोरोनाच उद्रेक वाढला असून, दीड महिन्यात तीस हजारांहून अधिक कोरोनाबाधित आढळून आले. कोरोनाबाधितांच्या संख्येत चाळीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. 

प्रशासनाने वेळीच उपाययोजना न केल्याने परिस्थिती उद्‍भवल्याचा आरोप शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आयुक्त कैलास जाधव यांना सादर केलेल्या निवेदनात केला आहे. 

प्रशासनाने ठोस उपाययोजना करून सहा विभागांसाठी विशेष वैद्यकीय अधिकारी नेमावे, स्पेशल फोर्स तयार करावा, शासनाकडून वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांची मागणी करावी आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या.

आयुक्त जाधव यांनी ऑक्सिजन बेडसह कोविड सेंटर व चाचण्या वाढविल्याची माहिती देताना कोरोना लढाईत राजकारण न आणता एकत्र येऊन लढण्याचे आवाहन केले.