जवळपास एक वर्षभरानंतर इस्रायलने देशभरात लागू असणाऱ्या मास्क वापरातील निर्बंधांमध्ये शिथिलता आणली आहे. देशातील जवळपास 80 टक्के जनतेला लस देण्यात यश मिळवल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
इस्रायलचे आरोग्यमंत्री यूली इडेलस्टेइन यांनी दिलेल्या माहितीनुसार लसीकरणा नंतर या ठिकाणी कोरोनाच्या संसर्गाचं प्रमाण लक्षणीयरित्या कमी झालं आहे.त्यामुळंच निर्बंधांमध्ये मोठ्या प्रमाणात शिथिलता आणण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णाचा आकडा कमी होण्यासोबतच मृतांचा आकडाही लक्षणीयरित्या घटला. जानेवारी महिन्याच्या मध्यापर्यंत या देशात दिवसाला 10 हजार कोरोना बाधित आढळत होते. आता हेच प्रमाण 100 आणि 200 वर पोहोचलं आहे.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार जवळपास 93 लाखांची लोकसंख्या असणाऱ्या या देशानं आतापर्यंत 50 लाखआंहून अधिक जनतेला कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली आहे. इस्रायलमधील टळणारं हे संकट पाहता इथं शाळाही सुरु होण्याच्या मार्गावर आहेत.