दरवर्षी श्री. नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या ऊत्सवानिमीत्त वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे आरोग्य शिबीराचे आयोजन होत असते. अनेक तज्ज्ञ डॉक्टर सेवेकरिता या शिबीरांस येत असतात. यावर्षिदेखील भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्येच दि. ७ फेबृवारी रोजी त्वचारोगतपासनी तसेच दिशा गृपतर्फे नेत्रतपासनी शिबीर संपन्न झाले. कारंजा व परिसरातील लोकांनी या शिबीरास ऊत्तम प्रतिसाद देउन सेवेचा लाभ घेतला.
सुरुवातीला सकाळी १० वाजता कार्यक्रमाचे ऊद्घाटन करण्यात आले. यावेळी कारंजा शहराचे तहसीलदार धीरज मांजरे, माजी आ. प्रकाश डहाके, पीअाय जाधव आणि विश्वस्त मंडळ गुरुमंदिर संस्थान यांची विशेष ऊपस्थिती होती. दिशा संस्थेच्या कार्याची दखल घेत तहसीलदार धिरज मांजरे यांनी दिशा गृपचे कौतुक करत ग्रामीण भागात देत असलेल्या सेवाकार्याबद्दल आभारसुद्धा मानले.
ऊद्घाटन सोहळ्यानंतर प्रत्यक्ष शिबीरांस सुरुवात झाली. सकाळी ११ ते ६ वाजेपर्यंत या शिबीराचा वेळ होता. यादरम्यान एकुण ८० व्यक्तींनी यावेळी नेत्रतपासनी केली. येत्या १४ तारखेला दिशातर्फे पुन्हा नेत्रपासणी शिबीर घेण्यात येणार आहे.
दरवर्षी श्री. नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या ऊत्सवानिमीत्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. ४५ दिवसांचा महाराजांचा ऊत्सव विशेष मानला जातो. या ऊत्सवादरम्यान भजन, किर्तन, गायन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन मंदिरतर्फे करण्यात येत असते. सोबतच आरोग्य शिबीरांचेसुद्धा आयोजन होत असते. यंदाच्या कोरोनापरिस्थितीमुळे ईतर कार्यक्रम रद्द करण्यात आले. मात्र आरोग्य शिबीरांचे आयोजन करण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे.
या आरोग्य शिबीरासाठी पत्रकार समीर देशपांडे, प्रज्वल गुलालकरी आणि निलय बोन्ते यांनी विशेष परिश्रम घेतले.
अल्प परिचय दिशा संस्था
दिशा संस्था आरोग्यक्षेत्रात विशेषत: डोळ्यांच्या बाबतीत विशेष कार्य करते. दिशा गृपचे नेत्रदानातसुद्धा मोठे योगदान आहे. दिशातर्फे मोफत नेत्रतपासणी केली जाते. महाराष्ट्रात विविधठिकानी दिशाच्या ४ आयबॅंक आहेत. सन २०१८ पर्यंत दिशाच्यावतीने ७००० नेत्रदान यशस्वीरीत्या झाले आहे. संस्थेशी एकुण १८०० स्वयंसवेक जुळलेले असून सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्या तरुणांमध्ये संस्थेविषयी विशेष आकर्षन आहे. ग्रामीण भागांतील जे लोक ऊत्तम आरोग्यसेवांपासून लांब राहतात अश्यांपर्यंत पोहचून त्यांना सुविधा मिळवून देणे हा दिशाचा मुख्य ऊद्देश असल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात येते.