अन म्हणून कंगना टीमचे अभिनंदनच करायला हवे:रोहित पवार

75

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी मुंबईमध्ये तीन कोटी ७५ लाख रुपयांचे ऑफिस खरेदी केल असता कंगनाने ट्विट करत, भाजपला पाठिंबा देऊन मला काहीच मिळालं नाही. पण उर्मिलाला काँग्रेसमुळे खूप फायदा झाला आहे, असे म्हटले आहे. कंगनाच्या या ट्विटवर राष्ट्रवादी पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत भाजपला खूश करण्यासाठीच महाराष्ट्राची बदनामी केल्याची कबुली दिल्याबद्दल अभिनंदन असल्याचे म्हटले आहे.

शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर आणि अभिनेत्री कंगना रौनत यांच्यामध्ये झालेला शाब्दिक वाद २०२० मध्ये चर्चे राहिला होता. आता २०२१ या वर्षाच्या सुरुवातीलाच या दोघींमध्ये पन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे.भाजपला पाठिंबा देऊन मला काहीच मिळालं नाही. पण उर्मिलाला काँग्रेसमुळे खूप फायदा झाला आहे. उर्मिलाजी मी स्वत:च्या मेहनतीने घर विकत घेतले होते. पण काँग्रेस ते तोडत आहे. भाजपला खूश करुन माझ्या हातात फक्त २५-३० कोर्ट केस आल्या आहेत. मी ही तुमच्यासारखी समजूतदार असते तर काँग्रसला खूश केलं असते, असे कंगनाने ट्विट करत म्हटले आहे

भाजपला खूश करण्यासाठीच महाराष्ट्राची बदनामी केल्याची कबुली देऊन #महाराष्ट्रद्रोही भाजप महाराष्ट्राचा मुखवटा टरकावत खरा चेहरा पुढं आणल्याबद्दल कंगना टीमचे अभिनंदनच करायला पाहिजे. या द्रोहाबद्दल भाजपला काय शिक्षा द्यायची ते आता राज्याची स्वाभिमानी जनताच ठरवेल!.कंगनाच्या या ट्विटवर रोहित पवार यांनी असे  भाष्य केले आहे.