काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे कोरोनाने निधन, २३ दिवसांपासून सुरू होते उपचार

43

राजीव सातव यांचे कोरोनामुळे निधन झाले. सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये मागील 23 दिवसांपासून उपचार सुरु होते. आज अखेर राजीव सातवांचा कोरोना व इतर आजारांसोबत केलेल्या संघर्षाचा शेवट झाला. सातवांच्या निधनाच्या बातमीने हिंगोलीकरांनाच मोठा धक्का बसला आहे. पंचायत समिती सदस्य ते खासदार असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे.

राजीव सातव यांना २१ एप्रिल रोजी करोनाणी लागण झाली होती. यानंतर २३ एप्रिल रोजी सातव यांना पुण्यातील जहांगीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरूवातीला त्यांची प्रकृती चांगली होती. पण, २५ एप्रिलनंतर प्रकृती बिघडली. काही दिवसानंतर प्रकृतीत पुन्हा सुधारत असल्याची माहिती येऊ लागली. पण, पण अचानक प्रकृती खालवल्याने उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

शरद पवार, संजय राऊत, राहुल गांधी यांच्यासह इतर नेत्यांनी ट्विट करून श्रद्धांजली वाहिली आहे