अखिल भारतीय काँग्रेस कमिटी चे गुजरात प्रभारी, काँग्रेस नेते राजीव सातव यांनी कारोनावर मात केली आहे.
19 दिवसांच्या उपचारांती त्यांची कोरोना चाचणी नेगेटिव्ह आली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
राजीव सातव यांनी लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. राजीव सातव यांच्यावर २३ एप्रिलपासून पुण्यातील जहाँगीर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती मोठ्या प्रमाणावर खालावल्याच्या बातम्या मिडियामध्ये आल्या होत्या.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वत: पुण्यातील डॉक्टरांशी फोनवरुन राजीव सातव यांच्या प्रकृती संदर्भात चर्चा केली होती. तज्ज्ञ डॉक्टरांकडून राजीव सातव यांच्यावर उपचार व्हावेत यासाठी राहुल गांधी यांनी मोठे प्रयत्न केले होते.
राजीव सातव हे माजी आमदार रजनी सातव यांचे चिरंजीव आहेत. शिवसेनेचे सुभाष वानखेडेंना पराभूत करत राजीव सातव 2014 मधील लोकसभा निवडणुकीत हिंगोली जिल्ह्यातून संसदेत निवडून गेले होते. सध्या ते काँगेसच्या गुजरात प्रभारीपदी आहेत.