‘महाराष्ट्रातले काँग्रेस नेते ‘सामना’ वाचत नसतील; पण सोनिया गांधी ‘सामना’ची दखल घेतात’ – सामना

10

महाराष्ट्रातील काँग्रेसचे पुढारी आपण सामना वाचत नसल्याचा टेंभा मिरवतात. हा त्यांचा प्रश्न आहे. पण सोनिया गांधीही ‘सामना’ची दखल घेतात, अशा कणखर शब्दांत शिवसेना नेते संजय राऊत यांनी नाना पटोले यांना टोला लगावला आहे.

नुकत्याच झालेल्या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. काँग्रेसच्या पराभवावर शिवसेनेच्या मुखपत्र ‘सामना’तून अग्रलेख छापून आला होता. त्या अग्रलेखात काँग्रेसच्या नेतृत्त्वाविषयी शंकाही उपस्थित करण्यात आल्या होत्या.

त्या अग्रलेखावर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हरकत घेऊन, राऊत यांच्यावर लगावला होता. संजय राऊत यांच्या बोलण्याकडे लक्षही देत नाही आणि आम्ही ‘सामना’ही वाचत नाही, असे नाना पटोले म्हणाले होते.

आज सामना अग्रलेखातून संजय राऊत यांनी पटोले यांना जोरदार प्रतिउत्तर दिलं आहे. महाराष्ट्रातले काँग्रेस पुढारी आपण ‘सामना’ वाचत नसल्याचा टेंभा मिरवतात हा त्यांचा प्रश्न, पण सोनिया गांधी ‘सामना’ची दखल घेतात. असा निर्वाळा संजय राऊत यांनी दिला आहे.