महाराष्ट्र राज्याचे काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनी राज्यातील काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांची शनिवारी नवी दिल्ली येथे बैठक बोलावली आहे. पाच राज्यांच्या विधानसभांच्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुका, तसेच महाराष्ट्रात होणार्या काही निवडणुका त्या पृष्ठभूमिवर राज्यातील पदाधिकार्यांत काही बदल, प्रदेशाध्यक्षपदाबाबत विचार, त्यासंदर्भातील बदल अशा विविध मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
सततच्या येणार्या परजयामुळे आणि पक्षातील जेष्ठ नेत्यांच्या हेव्यदाव्यांमुळे कॉंग्रेसचे जमिनिवरील संघटन कमकुवत होतांना दिसते. या पार्श्वभूमिवरच महराष्ट्रातील पक्षसंघटनेची जवाबदारी एच.के. पाटील यांच्यावर सोपवण्यात आली.
महाराष्ट्राच्या प्रभारीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर एच. के. पाटील यांनी पक्षसंघटनेत बदल करण्यास सुरुवात केली आहे. पुढील वर्षी होणारी मुंबई महापालिकेची निवडणुक काँग्रेसच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. त्याचा विचार करून मुंबई काँग्रेसमध्येही फेरबदल करण्यात आले. भाई जगताप यांच्याकडे अध्यक्षपद सोपविण्यात आले. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष बदलाबाबतही हालचाली सुरू झाल्या आहेत.
प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे महसूलमंत्री आहेत, तसेच विधिमंडळ पक्षनेतेपदही त्यांच्याकडे आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपद अन्य नेत्याकडे सोपविण्याबाबतचा विचार पक्षात सुरू आहे. नविन वर्षातील जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात पाटील यांनी मुंबईत पक्षाचे मंत्री, वरिष्ठ नेते, आमदार, पदाधिकारी यांच्या बैठका घेऊन प्रदेशाध्यक्ष बदलाबाबत त्यांची मते जाणून घेतली. त्या वेळी वेगवेगळी मते मांडण्यात आली. प्रदेशाध्यक्ष बदलण्याची एवढी घाई का केली जात आहे, असा प्रश्नही काही आमदारांनी उपस्थित केल्याचे समजते.
एच. के. पाटील यांनी शनिवारी दिल्लीत राज्यातील सर्व काँग्रेस मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. येत्या आगामी काळात पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, आसाम आणि पुदुचेरी येथील विधानसभांच्या निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रातील कॉंग्रेस नेते अनूभवी आणि जाणकार आहे. अनेक निवडणुकांत प्रभारी म्हणून काम केल्याचे अनूभव राज्यातील बहूतांश कॉंग्रेस नेत्यांकडे आहे. त्यामुळे या निवडणुकांमध्ये काही जबाबदाऱ्या देण्याबाबत चर्चा होणार असल्याचेदेखील सांगण्यात येत आहे.