महाराष्ट्रात काँग्रेसचा ‘एकमेव खासदार’ पण तमन्ना मोदींच्या विरोधात लढायची, काय म्हणालेत पहाच…

15


महाराष्ट्रात २०१४ आणि २०१९ मध्ये काँग्रेस पक्ष जवळपास भुईसपाट झाला, तरीही काँग्रेसने चंद्रपूर येथील एकमेव जागा जिंकली. त्याठिकाणी बाळू धानोरकर खासदार म्हणून निवडून आले. मात्र, अन्य जागांवर मोठा पराभव काँग्रेसला पत्करावा लागला होता. आता त्याच एकमेव काँग्रेस खासदाराने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ललकारलं आहे.

खासदार बाळू धानोरकर यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात निवडणूक लढण्यासाठी तयारी दर्शवली आहे. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याने राजकीय क्षेत्रात चर्चेला उत आला आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत तयारीसाठी फक्त 15 दिवस मिळाले होते. आता तयारीला तीन वर्षे बाकी आहेत. पक्षाने आदेश द्यावा, मी वाराणसीतून लोकसभा निवडणूक लढायला तयार आहे, असं खासदार बाळू धानोरकर म्हणाले. याबाबत टीव्ही ९ मराठीने वृत्त दिले आहे. त्यामुळे खरंच बाळू धानोरकर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात निवडणूक लढवतात का ते पुढच्या लोकसभेत पाहायला मिळेल.