काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचा मोदींवर हल्ला; देशाला पीएम आवास नाही, श्वास हवा

10

कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर देशाच्या आरोग्य व्यवस्था ढेपाळली असल्याने मोठ्या प्रमाणात टीका होतेय. आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही मोदींवरील जोरदार टिका केली आहे.

राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदींवर टीकेची झोड उठवली आहे. देशाला पीएम आवास नव्हे, श्वास हवा.
असं ट्विट करत राहुल गांधींनी मोदींवर टिका केली आहे. देशाची झालेली अवस्था वेळोवेळी राहुल गांधी दाखवून देत असतात.

ट्विटसोबत त्यांनी दोन फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत इंडिया गेट आहे. त्या ठिकाणी बांधकामासाठी खोदकाम केलेलं दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत लोक तोंडाला मास्क लावून रिकामे ऑक्सिजन सिलिंडर घेऊन ऑक्सिजनसाठी रांगेत उभे आहेत.

राहुल यांनी काळजी मोदींवर जीएसटी वसुलीवरून टीका केली होती. जनतेचा जीव जात आहे. पण पंतप्रधानांची टॅक्स वसुली काही थांबलेली नाही, अशी टीका राहुल ट्विटरवर केली होती.