मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्र हातात आल्यानंतर आमदार भाई जगताप यांनी पहिल्याच दिवशी स्वबळाचा नारा दिला आहे. येऊ घातलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसने २२७ जागा स्वबळावर लढवाव्यात असं माझं मत असल्याचं भाई जगताप म्हणाले आहेत.
मुंबई महापालिकेत एक वेळ होती ज्यावेळी काँग्रेसचे ७५ नगरसेवक होते. मात्र, मागील १० वर्षांमध्ये ही संख्या ३० ते ३५ वर आली आहे. ही संख्या वाढवण्यासाठी पूर्ण ताकदीने लढणार असल्याचंही भाई जगताप यांनी म्हटलं आहे.
मुंबई काँग्रेसमध्ये झालेला हा खांदेबदल पक्षाला किती फायदा मिळवून देतो ते येणाऱ्या काळात पाहायला मिळेल. मात्र, राज्यात काँग्रेस शिवसेनेसोबत सत्तेत असताना भाऊ जगतपांची ही इच्छा पूर्ण होईल का ? हे येणारा काळ ठरवणार आहे.