कॉंग्रेस सोशल मिडिया वॉरीयर्सची मुंबईत सुरुवात!

51

आजचे तंत्रज्ञानाने भारलेल्या काळात डीजीटल माध्यमांचे महत्व अनन्यसाधारण आहे. मागील काही दिवसांपासून कॉंग्रेस पक्षामध्ये मोठ्याप्रमाणात बदलांना वाव मिळतो आहे. याच पार्श्वभूमिवर काही दिवसांअगोदर डिजीटल माध्यमांवर कॉंग्रेसने नविन विभाग निर्माण करण्याचा निर्णय घेतला आणि मुंबईत दि. १० फेबृवारीस मुंबईतून यांस सुरुवात झाली.

कॉंग्रेस सोशल मिडिया वॉरीयर्स असे या विभागाचे नाव असणार आहे. यामध्ये संपूर्ण देशभरातून पाच लाख स्वयंसेवक भरती करण्यात येणार आहे. यातील ५० हजार सभासदांना निरनिराळी पदे देऊन विशिष्ट, महत्त्वाची जबाबदारी देण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील स्वयंसेवकांचा यात समावेश करण्यात येणार आहे. दोन दिवसांअगोदर कॉंग्रेसच्या सोशल मिडिया कोअर कमीटीतर्फे दिल्लीतून या अभियानांस सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्रात मुंबईतून याची सुरुवात झाली. ऑल इंडिया काँग्रेस कमिटी, सोशल मीडिया डिपार्टमेंट आणि मुंबई काँग्रेसच्या सोशल मीडिया यांच्या संयुक्त सोशल मीडिया मोहिमेचे उद्घाटन मुंबई कॉंग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष भाई जगताप यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी सोशल मीडिया नॅशनल कोऑर्डिनेटर गौरव पांधी, मुंबई काँग्रेस सोशल मीडिया अध्यक्ष आशीष जोशी, राजेश चतवाल, मुंबई काँग्रेसचे भूषण पाटील, संदेश कोंडविलकर आदी उपस्थित होते.

सोशल मिडियाचे आपल्या दैनंदिन जिवनातील महत्व भाई जगताप यांनी यावेळी विषद केले. तसेच देशातील सध्याची गंभीर परिस्थिती, यातून निर्माण होणार्‍या समस्या यांबद्दल युवकांना जागृत करण्याचे काम कॉंग्रेसच्या या विभागातर्फे होईल. सोबतच कॉंग्रेसचा मुळ विचार, गांधीजींचा विचार युवकांत रुजवण्यावी गरज आज प्रकर्षाने जाणवते आहे. त्यामुळे जास्तीत जास्त युवकांनी या अभियानात सहभागी व्हावे, कॉंग्रेसशी जुळावे आणि मानवतावादी विचारांचा पुरस्कार करावा असे आवाहनसुद्धा भाई जगताप यांनी यावेळी केले.

या अभियानाचे सभासद होण्यासाठी कॉंग्रेसने काही मोबाईल नंबर, ई-मेल आणि वेबसाईटसद्धा दिली आहे.  सभासद होण्याची ईच्छा असल्यास मिस्ड कॉल – १८०० १२०० ०००४४, व्हॉट्सअॅप नंबर – ७५७४० ००५२५, ई मेल – smw@inc.in, वेबसाइट – www.incsmw.in किंवा www.incsmwarriors.com यांवर संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

आगमी विधानसभा निवडणुकींना समोर ठेऊन कॉंग्रेस संघटनात्कमदृष्ट्या अनेक बदल करत आहे. महाराष्ट्र कॉंग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांत मोठे बदल झाले आहेत. सततच्या पराभवामुळे संघटनात्म पद्धतीवर कॉंग्रेस काहीशी खिळखिळी झाल्याची स्थिती होती. मात्र कॉग्रेसच्या सोशल मिडिया वॉरीयर्स अभियानामुळे चित्र पालटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कॉंग्रेसच्या या अभियानाचा येणार्‍या निवडणुकांत किती फायदा होणार यांकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.