केशव उपाध्ये यांनी सरकार कंत्राटदार, आणि विकासक धार्जिणे असल्याची टीका केली आहे. राज्यातील नागरिकांच्या नशिबी कोंडा आला असून कंत्राटदारांना मात्र मणीहार घातला जात आहे, असे केशव उपाध्ये यांनी काव्यमय शैलीत म्हटले आहे. ‘उद्धवा अजब तुझे सरकार’ असे म्हणत त्यांनी मंत्र्यांच्या गाड्यांना सरकार पैसे देते. कंत्राटदारांची बिलं द्यायला सरकारकडे पैसै आहेत. मात्र, मुंबईकरांना मालमत्ता करात सवलत मिळत नाही. वेगवेगळ्या सामाजिक घटकांना मदत मिळत नसल्याची टीका केली आहे.
त्यावर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी उघड डोळे बघ नीट केशवा, तुझा शब्दच्छल आहे फसवा, समाधानी आज राज्यातला बापडा, म्हणतोय, महाविकास आघाडी ‘छे आपडा’ असे सांगत केशव उपाध्येंना उत्तर दिले आहे.
ट्विटरवरून ‘उद्धवा अजब तुझे सरकार’ म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारवर टीका केलीराज्यातील बांधकाम विकासकांना प्रीमियममध्ये 50% सवलत देण्याचा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर महाविकास आघाडीवर भाजपाकडून टीका होत आहे.