चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा निशाणा

6

मराठा आरक्षण  हा राज्याचा विषय आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटते. त्यामुळेच पंतप्रधान मोदी यांची आजपर्यंत संभाजीराजे छत्रपतींशी  भेट होऊ शकली नाही, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील  यांनी केल होत.

त्यावर काँगेसचे सचिन सावंत यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका केलीय.1 – मोदींची विषयांची समज फार कमी आहे. 2 – मोदींना मराठा आरक्षण हा विषय समजलाच नाही. 3 – छत्रपती संभाजीराजे यांच्या नावातील छत्रपती या उपाधीची केवळ निवडणुकीत वापरण्याइतपतच मोदींच्या लेखी किंमत आहे’, असं ट्विट त्यांनी केले आहे.

सोमवारी पुण्यात चंद्रकांत पाटील प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर फार सविस्तरपणे बोलणे टाळले. तर दुसरीकडे चंद्रकांत पाटील यांनी ब्राह्मण समाजातील दुर्बल घटकांविषयी चिंता व्यक्त केली.