केंद्र सरकारने तीन कृषी कायदे बहुमत नसताना पास केलेले आहेत. त्याला देशभरातील शेतकरी आणि राजकीय मंडळी विरोध करतायत.त्यावरून दिल्ली येथील शेतकऱ्यांचे आंदोलन हिंसक होण्याला संपूर्णपणे केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार आहेत, असे म्हणत काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
नरेंद्र मोदींनी चर्चेचा कोणताही मार्ग न अवलंबता कायदे घाईगडबडीने लादण्याचा मार्ग अवलंबला. हम करे सो कायदा हि मोदींची भूमिका चुकीची आहे.या घटनेची तीव्र शब्दात निंदा करत असून, मोदी सरकारने हटवादीपणा सोडून कृषी विधेयक तात्काळ मागे घ्यावीत, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.
याआधीचे मनमोहन सिंह व वाजपेयी सरकार कोणतेही कायदे करताना सर्वांना विश्वासात घेऊन त्याची अंमलबजावणी केली जायची.मोदी सरकारने कायदे करताना कोणाशीही चर्चा केली नाही व हे अन्यायी कृषी कायदे शेतकऱ्यांवर लादले गेले.
शेतकरी दिल्लीच्या सीमेवर गेले दोन महिने कडक थंडीमध्ये बसून आहेत आणि ते परत घरी जायला तयार नाहीत. अशा परिस्थितीत केंद्र सरकारकडून चर्चेच्या फेऱ्या झडतायत. त्यातून काही मार्ग निघत नाही, शेतकऱ्यांना सरकारचा तोडगा मंजूर नाही.
केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही आडमुठी भूमिका आहे. मोदींच्या हटवादीमुळे यातून काहीही तोडगा निघत नाही. मोदी सरकार आल्यापासून नोटबंदी आणि जीएसटीसारख्या अनेक गोष्टी त्यांनी रेटून नेल्या. कारण त्यांच्याकडे लोकसभेमध्ये बहुमत आहे. जे कायदे ज्या जनतेसाठी करायचे असतात त्यांनाच विश्वासात न घेता ते लादले जाणे हे अत्यंत दुर्दैवी आहे.
मोदी सरकारने असं काहीही न करता अत्यंत हटवादी भूमिका घेऊन हे कायदे पास करून घेतले आहेत. राजधानी दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी संपूर्णपणे केंद्र सरकार जबाबदार असल्याचेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
या घटनेची तीव्र शब्दात निंदा करत असून, मोदी सरकारने हटवादीपणा सोडून कृषी विधेयक तात्काळ मागे घ्यावीत, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.