शनिवारी खासदार बाळू धानोरकर यांनी वाराणसीला भेट दिली. मोदी दुसऱ्यांदा येथून खासदार झाले आहेत, तरीही या मतदारसंघाचा पाहिजे तसा विकास झाला नाही आणि हे लोक करूही शकत नाही. ईव्हीएमने आलेले हे सरकार आहे. यांच्यात धमक असेल, तर आगामी निवडणूक ईव्हीएम सोडून मतपत्रिकांवर घ्यावी, असे आव्हान धानोरकर यांनी सत्ताधाऱ्यांनी दिले आहे.
यावेळी खासदार धानोरकर म्हणाले, संपूर्णानंद विद्यापिठातील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे वेतन दिले गेलेले नाही. वसतिगृहातही खाण्यापिण्याच्या सुविधा चागंल्या नाहीत. देशाच्या पंतप्रधानांच्या मतदारसंघाची अशी अवस्था असेल, तर देशात काय चित्र असेल, याची कल्पनाही न केलेलीच बरी.
मोबाईल चार्जरसारख्या ज्या चैनीच्या नव्हे तर प्रत्येकाच्या गरजेच्या वस्तू आहे. त्या सुद्धा महागल्या आहेत. या सर्व कारणांमुळे आता मात्र या देशाच्या शेवटच्या माणूस व शेतकरी या मोदी सरकारला आपली जागा नक्की दाखवेल, असे खासदार धानोरकर म्हणाले.
इतर राज्याच्या तुलनेत या चारही राज्यासाठी 2.27 लाख कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधांसाठी तरतूद करण्यात आली आहे. त्याच्या तुलनेत महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली आहेत, अशी प्रतिक्रिया खासदार धानोरकर यांनी आजच्या अर्थसंकल्पावर दिली
पक्षश्रेष्ठींनी परवानगी दिल्यास वाराणसी लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवू आणि जिंकूनही दाखवू, असे म्हणत चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच आव्हान दिले. त्यानंतर देशभरात ते चर्चेत आले.