वाशिम-यवतमाळ मतदारसंघातील रस्त्यांना राष्ट्रीय महामार्गाशी जोडले जाणार असल्याची माहिती खा. भावनाताई गवळी यांनी दिली आहे. मतदारसंघातील चार मार्ग राष्ट्रीय महामार्गाला जुळणार आहेत. रस्ते व महामार्ग विकासमंत्री नितीन गडकरी यांनी तशी मंजुरातसुद्धा दिली आहे.
मतदारसंघातील काही मार्ग राष्ट्रीय महामार्गाशी जोडले जावेत अशी विनंती रस्ते व महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांचेकडे केली होती नितीन गडकरी यांनी या प्रस्तावास मंजुरात दिली आहे.
यामध्ये कारंजा-मुर्तीजापुर मार्ग राष्ट्रीय महामार्ग एन.एच. ३६१ सी, मुंबई – नागपुर महामार्ग क्रं. ६ ला जोडण्यात यावा, राष्ट्रीय महामार्ग ७५३ सी जालना-सिंदखेडराजा-कारंजा-वर्धा या मार्गाची अवस्था बिकट झाली असून या मार्गाचे नुतकणीकरण करण्यात यावे, राज्य महामार्ग ५४८ सी, रिसोड-मेहकर या रस्त्याला सक्रीय महामार्गामध्ये प्रस्तावित करुन मंजुरात प्रदान करावी. पुसद-गुंज-महागाव या रस्त्याचे राष्ट्रीय महामार्गात समावेश करुन रस्ता मंजुर करावा, मध्य प्रदेशमधील हरिसालपासून अमरावती, यवतमाळ जिल्ह्यातून जाणार्या महामार्गाचे रुपांतर चार लेनमध्ये करावे अशाप्रकारच्या विनंत्या करण्यात आल्या.
या रस्त्यांना मंजुरात मिळाल्याने तसेच राष्ट्रीय महामार्गांना रस्ते जोडले गेल्यामुळे मतदारसंघातील विकासावर त्याचा सकारात्मक परिणाम होणार आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील रहिवाशांमध्ये समाधानाचे वातवरण आहे.