दिल्ली येथे खा. श्रीनिवास पाटील यांनी ना.नितीन गडकरी यांची भेट घेऊन सातारा जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गाच्या विविध प्रश्ना संदर्भात चर्चा केली. शेंद्रे – कागल भागातील राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले सहा पदरीकरणाचे काम तातडीने मार्गी लावण्यात यावे. कराड येथे कोल्हापूर नाक्यावर तीन पदरी पूल असल्यामुळे आजवर अनेक अपघात झाले आहेत. त्या अपघातामध्ये अनेकांना आपल्या प्राण गमवावे लागले आहे.
अपघात टाळण्यासाठी कोल्हापूर नाक्यावरील सहापदरी उड्डाणपूलाचे काम तात्काळ सुरू करावे अशी महत्वाची मागणी खा. पाटील यांनी त्यांच्याकडे यावेळी केली. पुणे-सातारा आणि शेंद्रे – कागल या रस्त्याचे अपूर्ण राहिलेले काम तातडीने पूर्ण करणार असून कराड, कोल्हापूर नाका येथे उड्डाणपूल बांधण्याच्या सूचना संबंधितांना केल्या असल्याचे आश्वासन केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी खासदार श्रीनिवास पाटील यांना दिले.
नितिन गडकरी यांनी पुणे ते शेंद्रे या रस्त्याची गुणवत्ता वाढवविणार असल्याचे व शेंद्रे ते कागल या रस्त्याचे सहा पदरीकरणाचे काम लवकरच मार्गी लावणार असल्याचे सांगितले पुणे – शेंद्रे या राष्ट्रीय महामार्गाची बिकट अवस्था झाली आहे.