कृष्णा पुलावरून विद्यानगरला शिक्षणासाठी हजारो विद्यार्थी दररोज ये- जा करतात. त्यातील अनेक विद्यार्थी- विद्यार्थिनी सायकलवरून ये- जा करतात.कऱ्हाड- विटा-पंढरपूर महामार्गावरील शहरापासूनचा जवळच्या कृष्णा नदीवरील नवीन पुलाचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे.
सातत्याने त्या पुलावर वाहतुकीची कोंडी होत आहे. मात्र, तरीही नवीन पुलाचे काम होत नसल्याने आश्चर्यच व्यक्त होत आहे. लोकप्रतिनिधींच्याही दुर्लक्षामुळे ठेकेदारांकडून तातडीने कामाची पावले उचलली जात नाहीत.
खासदार श्रीनिवास पाटील यांच्या सूचनेनुसार त्या पुलावरील रस्त्याचे काम करण्यात आले. मात्र, त्या पुलावरील वाहतुकीची वर्दळ कायमच आहे. त्याचा विचार करून सध्याच्या पुलाच्या शेजारीच नवीन पूल उभारण्यात येत आहे.
त्यातच सायकलस्वारांचा जीव गुदमरल्यासारखी स्थिती होत आहे. त्याचाही विचार करून तातडीने या नवीन पुलाचा प्रश्न मार्गी लावण्याची गरज आहे.त्यामुळे आणखी किती दिवस पुलाचे काम रेंगाळणार हा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे.