शेतकरी आंदोलनावरुन निर्माण झालेले ट्वीटर प्रकरण थांबता थांबत नाहीये. परदेशातील सेलीब्रीटींनी शेतकर्यांच्या समर्थनार्थ ट्वीट केल्यानंतर आपल्या देशातील काही खेळाडू आणि कलाकारांनी त्यास प्रत्युत्तर दिले होते. यावरुन ट्वीटर वॉर सुरु झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. हे ट्वीटर वॉर शमते न शमते तोच महाविकासआघाडी सरकारने यासंबंद्धि एक निर्णय घेतला आहे. या निर्णयावरुन पुन्हा भाजप विरुद्ध महाविकासआघाडी सरकार असा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
प्रत्युत्तरादाखल आपल्या देशातील सेलीब्रीटींनी केलेल्या ट्वीटमध्ये समानता आहे. सरकार या सेलीब्रीटींवर दबाव आणते आहे का? हे बघण्यासाठी महाराष्ट्रातील ट्वीट करणार्या सेलीब्रीटींची त्या ट्वीटवरुन चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. आज गृहमंत्री अनिल देशमुख आणि कॉंग्रेस नेत्यांत झूम मीटींगद्वारे बैठक झाली. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी केलेल्या ट्वीटला भारतीय सेलिब्रिटींनी दिलेल्या प्रत्युतरामागे भारतीय जनता पक्षाने त्यांना प्रवृत्त केले होते का? व भाजपाचा त्यांच्यावर कोणता दबाव होता का? देशपातळीवरती अनेक संवैधानिक संस्था, विरोधी पक्षांची सरकारे व मोदी सरकारच्या विरोधात बोलणाऱ्या व्यक्तींवर मोदी सरकारचा प्रचंड मोठा विरोध असताना या राष्ट्रीय हिरोंच्या मागे देखील भाजपाचा दबाव असल्याचे नाकारता येत नाही. त्यामुळे या भाजपा कनेक्शनची चौकशी व्हावी अशी मागणी सावंत यांनी देशमुख यांच्याकडे केली. या प्रकरणाची चौकशी व्हावी म्हणून कॉंग्रेसने अनिल देशमुख यांचेकडे तसे निवेदनसुद्धा दिले आहे.
महाविकासआघाडी सरकारच्या या निर्णयावरुन भाजप नेत्यांनी महाविकासआघाडी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळेच ही बैठक अॉनलाईन घेण्यात आली. दरम्यान भाजप नेते अतुल भातखळकर यांनी या निर्णयावरुन अनिल देशमुख यांना टार्गेट केले आहे. अनिल देशमुखच्या मेंदुला कोरोना झालाय का? असा संतप्त सवाल त्यांनी ट्वीट लरत विचारला आहे.