महाराष्ट्र सरकारने बोर्ड परीक्षांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. 10 वी आणि 12 वी बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. 10 वीच्या परीक्षा जूनमध्ये होतील, तर 12 वीच्या परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस ठेवण्यात आल्या आहेत.
दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. लोकांनी उपचारासाठी हॉस्पिटलसमोर रांगा लावल्या आहेत. अनेकांना बेड मिळत नाहीत. कोरोनावर मात करण्यासाठी देशात लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. पण, तरीही कोरोनाचे थैमान थांबलेले नाही.
तमिळनाडू, छत्तीसगड आणि जम्मूमधील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. पुदुचेरीमध्ये आठवीपर्यंतचे क्लास 22 मार्चपर्यंत बंद असतील. गुजरातमध्येही शाळा, कॉलेज बंद ठेवण्याचा आदेश आला आहे.
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. राज्यात कोरोना महामारीच्या प्रकोप वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय पालकांकडूनही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत होती.