कोरोनामुळे केटरिंग व्यवसायिकांचे मोडले कंबरडे

6

वर्षभरापासून कोरोना महामारीने घातलेल्या थैमानामुळे आणि त्याच्या जोडीने आलेल्या निर्बंधांमुळे स्वयंपाकाची सेवा देणाऱ्या व्यवसायाचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे.

लग्नसराई देखील निर्बंधातच निघून जात असल्याने यावर अवलंबून असणाऱ्यांना अर्धपोटी राहण्याची वेळ आली आहे.जिल्हा केटरर्स असोसिएशनचे नोंदणीकृत जवळपास ७०० केटरर्स सदस्य आहेत तर सदस्य नसलेले सुमारे अडीच हजार पूर्णवेळ केटरिंग व्यावसायिक आहेत.

गेल्यावर्षीही आणि यंदाही व्यवसाय शून्य आहे. खरोखर कोरोनाची साखळी तोडायची असेल तर एकदाच २१ दिवसांचा लॉकडाऊन करा, सरसकट सर्व बंद करून टाका. जगताही येत नाही अन् मरताही येत नाही अशी अवस्था झाली आहे.