कोरोना लस घेतल्यावर बिनधास्त फिरता येणार; राजेश टोपे

65

देशात कोरोनाचे संकट अजून वाढत चालले आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा सध्याचा आकडा 1,03,05,788 आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशात तब्बल 1,49,218 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटी अंतर्गत देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आज (दि. २) पासून कोरोना लसीचे ड्राय रन केले जाणार आहे.


जालन्यात स्वत: आरोग्यमंत्री राजेश टोपे हे यावेळी उपस्थित आहेत. आरोग्यमंत्र्यांनी ड्राय रनची संपूर्ण प्रक्रिया त्यांनी समजावून सांगितली. दरम्यान जालन्यात रंगीत तालिमेची तयारी देखील पूर्ण झाली आहे. ही परवानगी मिळाल्यास प्रशासन लसीकरणासाठी सज्ज असल्याचे टोपे यांनी सांगितले आहे. यादरम्यान, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले कि, ‘लसीकर करत असताना प्रत्येक केंद्रावर दोन किंवा तीन प्रशिक्षित नर्स असतील. हि लस संबंधित व्यक्तीच्या दंडाला टोचतील. त्यानंतर त्या व्यक्तीला निरीक्षणाखाली ठेवण्यात येईल.  काही लोकांना लगेच चक्कर देखील येते. असा काही प्रकार घडल्यास लसीकरण केंद्रावर बेड, ऑक्सिजन पुरवठ्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली असेल.

लसीकरण झालेल्या व्यक्तीचं निरीक्षण करण्याचं काम आशा वर्कर्स, अंगणवाडीत काम करणाऱ्या महिला करतील. तसेच कोरोनाची लस घेतल्यानंतर बिनधास्त फिरता येईल, याबद्दलची शंकादेखील टोपेंनी दूर केली. कोरोनाची लस घेतली की फिरायला मोकळे, असं अनेकांना वाटू लागलं आहे. पण कोरोनाची लस घेतल्यावर शरीरात रोगप्रतिकारशक्ती तयार करण्यासाठी काही कालावधी जावा लागतो. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगसह इतर नियम पाळणं देखील गरजेचे आहे. असं सुद्धा राजेश टोपे यांनी सांगितले म्हणाले.