कोरोनामुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द

14

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर यंदाचे संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द करण्यात आले आहे, असे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. आता जानेवारीत अर्थसंकल्पीय अधिवेशन होईल. अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. पण आमच्याशी चर्चा करण्यात आली नसल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांनी वादग्रस्त कृषी कायद्यांवर चर्चा करण्यासाठी संसदेचे हिवाळी अधिवेशन बोलवण्याची मागणी केली होती. 

मात्र, कोरोनामुळे अधिवेशन होणार नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी सांगितलं की, आपण सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली आहे, आणि कोरोनामुळे अधिवेशन न घेण्याबाबत सर्वाचे एकमत झाले आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. देशात देखील कोरोनाचे संकट पुन्हा वाढत असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

संसदीय मंत्री जोशी यांनी काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांना लिहलेल्या पत्रात म्हटलंय की, करोनामुळेच पावसाळी अधिवेशन सुद्धा उशिराने सप्टेंबर महिन्यात झाले होते. कोरोना संकटामुळे यावेळी पावसाळी अधिवेशनात खूप खबरदारी घेतली गेली होती. सध्या डिसेंबर महिना अर्धा संपला आहे आणि लवकरच कोरोनाची लस येईल अशी शक्यता आहे. अधीर रंजन चौधरी यांनी म्हटलं आहे की, विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी कोरोना संकटासोबतच हिवाळी अधिवेशन आयोजित करण्याबाबत आपली काळजी व्यक्त केली होती. जानेवारीतील बजेट सत्र 2021 साठी उपयुक्त आहे.