पुणे जिल्ह्यात ४४४ गावे कोरोनामुक्त

39

पुण्यातील कोरोना स्थिती बिकट होत चालली आहे. दररोज रुग्णवाढीचा वेग जोराने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील सर्वच गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये रहिवाशांव्यतिरिक्त बाहेरील व्यक्तींना प्रवेश करण्यास प्रतिबंध लावण्यात आला आहे. 

अश्यातच सूत्रांच्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील 444 गावे कोरोनामुक्त झाली आहेत. कोरोनाच्या संसर्गानंतर ग्रामस्थांनी नियमांचे काटेकोर पालन केले. त्यामुळे गावांतून कोरोना हद्दपार झाला आहे. 

444 गावे म्हणजेच 31.62 टक्के गावे आता कोरोनामुक्त झाली.
संपूर्ण जिल्ह्याचा विचार केला तर भोर तालुक्यातील सर्वाधिक 101 गावे कोरोनामुक्त आहेत.