इंदापूर तालुक्यात खाजगी रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोना रुग्णांसाठी लागणारे रेमडीसीव्हीर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा झाला आहे. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांच्या नातेवाईकांची खूप मोठी धावपळ होत आहे.
इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात आपल्याकडे एकूण ८० रुग्ण दाखल करण्यात येतात. दररोज शेकडो नवीन रुग्णांची भर पडत असल्याने, आम्ही शर्थीचे प्रयत्न करून ८० पेक्षा अधिक रुग्णांवर उपचार करत असतो.
एप्रिल महिन्याच्या सोळा दिवसात म्हणजेच १ ते १६ एप्रिल दरम्यान, शहरी व ग्रामीण भागातील एकूण १ हजार ८२९ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे आढळून आले आहे.