‘इत्यादी’ कारणांमुळे वाढतोय कोरोना : मुख्यमंत्री

10

कोरोनाची परिस्थिती गेल्या महिन्यात नियंत्रणात येईल, अशी चिन्हे दिसत असतानाच कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा ही परिस्थिती का उद्भवत आहे, याची तपासणी करण्यासाठी केंद्र सरकारने पाहणीसाठी एक पथक पाठवलं होतं.

लोकांचा वाढता निष्काळजीपणा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या झालेल्या निवडणुका, लग्न समारंभ, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये झालेली वाढ इत्यादी कारणे कोरोना वाढीसाठी कारणीभूत आहेत.

कोरोना संबंधीच्या नियमांचे काटेकोरपण पालन करायला हवे, अशा सूचना केंद्रीय पथकाने केल्या आहेत. काँटॅक्ट ट्रेसिंगवर भर देणे आणि लसीकरण सुरू ठेवणे, असेही उपाय या केंद्रीय पथकाने सुचवलं आहे.

खासकरुन महाराष्ट्र आणि पंजाब या दोन राज्यांत कोरोना रुग्णांची वाढ होताना दिसत आहे.लोकलमधील गर्दीमुळे मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा फैलाव होत असल्याचं केंद्रीय पथकाने अहवालात प्रामुख्याने म्हटलं आहे.

तसेच राज्यातील आरोग्य यंत्रणा देखील आता खुप गांभीर्याने काम करत नसल्याचं केंद्रीय पथकाने या अहवालात नमूद केलं आहे.