संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात पुन्हा कोरोनाने डोके वर काढण्यात सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील विदर्भासह मुंबई, पुणे आणि ईतरही भागात अचानक कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होते आहे. या पार्श्वभूमिवर प्रशासन आणि शासन सतर्क झाले असून ठिकठिकाणी निर्बंध लावण्यात येत आहेत. नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र तरिसुद्धा लोक बिनधास्त असल्याचेच चित्र आहे. लग्नसोहळे, समारंभे, लोकप्रतिनिधींचे मोर्चे, मिरवणुका खुलेआम सुरु आहेत. परंतू आता प्रशासनाने कारवाईचा बडगा ऊगारण्यास सुरुवात केली आहे.
नुकतेच माजी खा.धनंजय महाडीक यांच्या सुपुत्राचे लग्न निपटले. यावेळी राजकीय वर्तुळातील अनेक मान्यवर ऊपस्थित होते. मात्र कोरोना नियमांना सगळ्यांनीच धाब्यावर बसवले होते. परिणामी आता हे लग्न वादाच्या भोवर्यात अडकून प्रशासनातर्फे कारवाई करण्यात आली आहे. धनंजय महाडीक यांच्यासह अन्य तीघांवर कोरोनासंबद्धीचे नियम मोडल्याने विविध कलमांअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीस, शरद पवारसह महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेते या लग्नसमारंभास ऊपस्थित होते.
मुंबईतसुद्धा प्रशासनातर्फे कठोर कारवाई करण्यात येत आहे. महापौर किशोरी पेडणेकर स्वत:रस्त्यावर ऊतरुन नियमांचे पालन करण्यासंबंद्धी आवाहन करत आहेत. परंतू त्याचवेळी विनामास्क फीरणार्यांना दंडसुद्धा देण्यात येत आहे. गेल्या तीन दिवसांत मुंबईत १७००० नागरिकांवर मास्क न वापरण्यामुळे दंड आकारण्यात आला आहे.
विदर्भातील अमरावती जिल्ह्यासह काही भागात कठोर लॉकडाऊन लावण्यात आला असून संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहे. विनाकारण बाहेर फीरतांना आढळल्यास पोलिसांकडून कारवाई करण्यात येते आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील काही भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आला आहे. नागपुर, पुणे, तसेच राज्यातील महत्वांच्या शहरांमध्ये रात्रीच्या संचारबंदीसोबतच शाळा व महाविद्यायेसुद्धा बंदचे आदेश आहेत.