मोदींच्या कोरोना प्रतिबंधासाठी घेतलेल्या चुकीच्या धोरणामुळेच देशात कोरोना मोठा उद्रेक : नाना पटोले

19

देशातील कोरोना प्रतिबंधासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, याची मागणी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. हे निवेदन शनिवारी (ता.२४) पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे नाना पटोले यांनी दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना प्रतिबंधासाठी घेतलेल्या चुकीच्या धोरणामुळेच देशात कोरोना मोठा उद्रेक झाला आहे, अशी टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

केंद्र सरकारने देशातील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस मोफत द्यावी, अशी मागणीही पटोले यांनी शनिवारी (ता.२४) पुण्यात पत्रकारांशी बोलताना केली.सध्या देशात निरपराध नागरिकांचे कोरोनाने मृत्यू होऊ लागले आहेत, असा आरोपही पटोले यांनी यावेळी केला.

यावेळी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष रमेश बागवे, आमदार शरद रणपिसे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार मोहन जोशी, दिप्ती चवधरी, माजी महापौर कमल व्यवहारे, आबा बागुल, अभय छाजेड, अतुल लोंढे आदी उपस्थित होते.