औरंगाबादच्या घाटीत कोरोना रुग्णाचा धुमाकूळ; तोडफोड करत डॉक्टरांना मारहाणीचा प्रयत्न

16

औरंगाबाद मधील घाटी रुग्णालयात कोरोना रूग्णाने तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला आहे. रुग्णालयाची तोडफोड करत असताना, रुग्णाने डॉक्टरांवर हल्ला करण्याचा प्रयत्नही केला. घरी जाण्याची मागणी या कोरोना रुग्णाने केली होती. संताप अनावर झाल्याने त्यानेही तोडफोड केल्याचे समजतय.

या कोरोना रुग्णाने केलेल्या तोडफोडीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. औरंगाबादच्या शासकीय रुग्णालय आणि महाविद्यालय (घाटी) या ठिकाणी हा सदरील प्रकार घडला आहे. पूर्ण बोर्ड क्रमांक 31 मधील रुग्णाने घरी जाण्याची मागणी केली होती. मात्र, त्यांला घरी जाऊ न दिल्याने त्याने रुग्णालयातच थयथयाट केला.

संबंधित कोरोनाग्रस्त रुग्णाने सुरुवातीला वॉर्डच्या दरवाजाची काच फोडली. हॉस्पिटल मधील स्टाफ रुग्णाची समजूत घालण्याचा प्रयत्न करत होता. मात्र रुग्ण कोणाचेही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. कोरोनाग्रस्त रुग्णाने घाटी हॉस्पिटल चांगलंच डोक्यावर घेतलं. कुठल्याही परिस्थितीत वॉर्डबाहेर पडण्याचा त्याचा निश्चय होता. अखेर सुरक्षारक्षकांनी वॉर्डच्या आत जाऊन रुग्णाची धरपकड केली.