कोरोना रोखायचा असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांप्रमाणे देशाला काम करावं लागेल – संजर राऊत

5


सध्या मुंबई शहरातील कोरोना रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व सूत्रे हातात घेतल्यानंतर मुंबईसारख्या शहरात कोरोना रुग्णांची संख्या निम्म्यावर आली आहे. मुख्यमंत्री ज्याप्रकारे कोरोनाची परिस्थिती हाताळत आहेत, त्याचं श्रेय त्यांना द्यावंच लागेल. महाराष्ट्राचा पॅटर्न दिल्लीत वापरला जात आहे. त्यामुळे देशातील कोरोना रोखायचा असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांप्रमाणे देशाला काम करावं लागेल, असं मत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मांडले आहे.


संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाचे कौतुक केले. देशातील मोठं शहर असलेल्या मुंबईमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत आहे. कारण जिल्ह्याचे प्रशासक, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या सगळ्यांनी आपल्या हातात सूत्रे घेतली आहेत. तसेच मुख्यमंत्री सर्व गोष्टींवर बारीख लक्ष ठेऊन आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्राचा पॅटर्न दिल्लीत राबवला जात आहे, असं संजय राऊत म्हणाले.


कोणत्याही युद्धात सेनापती हा प्रत्यक्ष युद्धभूमीवर जाऊन लढत नाही. तो वॉररुममध्ये बसून विजय मिळवून देतो. उद्धव ठाकरे यांनीही एकाच ठिकाणी बसून अगदी गावपातळीपर्यंत सर्व उपाययोजना राबवल्या जात आहेत की नाही, हे पाहिले. त्यामुळे राज्यातील कोरोना आटोक्यात आणण्याचे श्रेय त्यांना दिलेच पाहिजे, असं राऊत म्हणाले. यावेळी त्यांनी फडणवीस यांच्या पत्रावर भाष्य केलं. विरोधकांनी आता टीका करणं बंद करावं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहलं. या पत्रातील अनेक सूचना उत्तम असून राज्य सरकार त्याचा नक्कीच गांभीर्याने विचार करेल असे राऊत यांनी बोलून दाखविले होते.