कोरोनाने वाचलो अन महागाईने मेलो : राष्ट्रवादी महिला आघाडीने गॅस सिलिंडरचे, टू व्हिलर गाडीचे घातले श्राद्ध

13

देशभरात कोरोनाचे अस्मानी संकट असतानाच केंद्र सरकारच्या वतीने महागाईचे सुल्तानी संकट जनतेवर लादण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींनी सत्तेत येताना जनतेला महागाईपासून मुक्तीचं ,अच्छे दिनचे स्वप्न दाखवलं. देशातल्या जनतेने त्यांच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून त्यांच्या हातात देश सोपवला. मात्र, मोदींनी विश्वासघात केला. असे म्हणत राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने पुण्यात आंदोलन करण्यात आले.

मात्र पेट्रोल-डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, खाद्यतेल अशा सगळ्याच वस्तूंचे दर वाढवून केंद्र सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दर इतके वाढले आहेत.

जनतेला जगण्यापेक्षा मरण स्वस्त वाटू लागलं आहे. यामुळेच अकार्यक्षम केंद्र सरकारचा, वाढत्या महागाईचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे.

आज पुण्यात शहराध्यक्ष प्रशांत जगताप, विरोधी पक्ष नेत्या दिपालीताई धुमाळ, माजी उपमहापौर दिलीप बराटे, महिला शहराध्यक्ष मृणालिणीताई वाणी, नगरसेवक सचिन दोडके, युवक अध्यक्ष महेश हांडे, भावना पाटील, पुनम पाटील, अनिता पवार ,श्वेता होनराव इत्यादी महिला पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गॅस सिलिंडरचे व टू व्हिलर गाडीचे श्राद्ध घालत निषेध नोंदविण्यात आला आहे.