नागपुरातही प्राण्यांमध्ये कोरोना पसरतोय का अशी भीती निर्माण झाली आहे. त्याचं कारण म्हणजे नागपूरच्या प्राणी संग्रहालयातही एका वाघीणीची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. मात्र ती चाचणी निगेटिव्ह आल्यानं सर्वांनी सुटकेचा नि:शवास सोडला .
वाघाची कोरोना टेस्ट करण्याची नागपूर मधील पहिलीच घटना आहे. या वाघीणीच्या तपासणी केली असता तिला खोकला किंवा ताप असा काहीही त्रास नव्हता. त्यामुळं तिला औषधं न देता व्हिटॅमिन, मिनिरल असे इंजेक्शन देण्यात आले.
जान नावाच्या वाघीणीची तब्येत बिघडल्याच्या प्रशासनाच्या लक्षात आलं होतं. त्यानंतर जान या वाघीणीच्या नाकातून पाणी वाहायला सुरुवात झाली. त्यामुळं महाराजबाग प्राणी संग्रहालयाच्या प्रशासनानं तातडीनं तीचीही कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर वाघीणीनं जेवणंही चांगलं केलं आणि तिला कोणताही त्रास नव्हता त्यामुळं तिला पुन्हा अधिकावासात सोडल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.