१ मे पासून देशात लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात होणार असून यात १८ वर्षांवरील सर्वांचंच लसीकरण केलं जाणार आहे. आत्तापर्यंत १० कोटी पेक्षा अधिक नागरिकांचे भारतात लसीकरण करण्यात आले आहे. परंतु अनेकांच्या मनात लसीबाबत संका आहेत.
सरकारनं शंका दूर करण्यासाठी आकडेवारी जारी केली. यानुसार लसीकरण झालेल्यांपैकी ०.०२ टक्के ते ०.०४ टक्के लोकांनाच लसीकरणानंतर कोरोनाची बाधा झाली आहे.
म्हणजेच १० हजार लस घेणाऱ्या लोकांपैकी केवळ दोन ते चार लोकांनाचा कोरोनाचा संसर्ग झाल्याचं सरकारनं नमूद केलं. त्यामुळे लसीकरणाच्या बाबतीतीली शंका दूर व्हायला मदत होणार आहे.
देशात जवळपास १३ कोटी लोकांचं लसीकरण करण्यात आलं. यापैकी पहिला डोस घेणाऱ्या १०,०३,०२,७४५ लोकांपैकी केवळ १७,१४५ लोकांनाच कोरोनाचा संसर्ग झाल्याचं सांगण्यात आलं. हे एकूण संख्येच्या ०.०२ टक्के इतकं आहे. तर कोविशिल्डचा दुसरा डोस घेणाऱ्या १,५७,३२,७५४ लोकांपैकी ५,०१४ लोकांना संसर्ग झाला आहे. ०.०३ टक्के इतकं आहे.