पुण्यातील 18 वर्षांवरील व्यक्तींनाही कोरोना लसीकरणाची परवानगी द्यावी : अजित पवार

9

पुण्यातील 18 वर्षांवरील व्यक्तींनाही कोरोना लसीकरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार करणार असल्याचं सूत्रांकडून समजतंय.

पुण्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहे. पुणे शहरात रात्रीची संचारबंदी लागू केली जाणार आहे. तसेच पुण्यातील शाळा 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

18 वर्ष वयोगटावरील नागरिकांसाठी तात्काळ लसीकरण उपक्रम सुरु करण्यात यावा. त्यासाठी संबंधित राज्यांना अधिकाधिक लसी उपलब्ध करुन द्याव्यात, असं अजित पवार म्हणालेत.

पुणे जिल्ह्यातील भाजप खासदार गिरीश बापट, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे आणि शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला प्रस्ताव सादर करावा, अशी विनंती अजित पवारांनी केली आहे.

एक मार्चपासून 60 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लस देण्यास सुरुवात झाली. 45 वर्षांवरील सहव्याधी असलेल्या नागरिकांनाही लस दिली जात आहे .टाइम्स ऑफ इंडिया’ ने यासंदर्भात बातमी दिली आहे.