औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना लसीकरणास सुरवात

24

कोरोना संकटावर मात करण्यासाठी देशभरात आजपासून लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. 16 जानेवारीला औरंगाबाद जिल्ह्यात कोविड लसीकरण मोहिमेस पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत सुरूवात झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात 10 केंद्रांवर लसीकरणास प्रारंभ झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात कोवीड लसीकरण मोहीमेस पालकमंत्री तथा उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली.

यावेळी खासदार भागवत कराड, आमदार अतुल सावे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. बुधवारी औरंगाबाद शहरात सीरम इन्स्टिस्ट्यूट उत्पादित कोव्हिशील्ड कोरोना लशी दाखल झाली. घाटीत अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्या हस्ते लसीकरण केंद्राचे उदघाटन झाले. एकूण १८ ठिकाणी कोरोना लसीकरण होणार आहे. यातील सात हे महापालिका हद्दीतील ठिकाणांचा समावेश आहे.

सीरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने संयुक्तरित्या निर्माण केलेली ‘कोव्हिशील्ड’ आणि भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लस पहिल्या टप्प्यात कोरोनायोद्ध्यांना दिल्या जाणार आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात 10 केंद्रांवर लसीकरण होत आहे. घाटीत 200 आणि अन्य 9 केंद्रांवर 100 याप्रमाणे 10 केंद्रांवर पहिल्या दिवशी 1100 कोरोना योद्ध्यांना लस देण्याचे नियोजन आहे.

जिल्ह्यात १६ जानेवारीला सिल्लोड, गंगापूर, वैजापूर उपजिल्हा रुग्णालय, कन्नड, पाचोड, खुलताबाद ग्रामीण रुग्णालयात लसीकरणाला सुरूवात होणार आहे. तसेच गणोर, पालोद, दौलताबाद, मनूर, निजलगाव या पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांवरील बूथवर लसीकरणाला सुरुवात होणार आहे. औरंगाबाद शहराच्या हद्दीत सात ठिकाणी ती दिली जाणार आहे.