भारतातील कोरोना लसीची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. कोरोना व्हायससवर मात करण्यासाठी सर्वपातळीवर प्रयत्न केले जात आहे. अशातच आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी एक दिलासादायक बातमी दिली आहे. त्यांनी रविवारी सांगितले की जानेवारीच्या कोणत्याही आठवड्यात आम्ही भारतात कोरोना लसीचा पहिला डोस देण्याच्या तयारीत आहोत, तर पुढे त्यांनी असे ही म्हटले की, कोविड19 चे लसीकरण आणि त्यांच्या चाचण्यांबद्दल देशात पाठी नाही आहे. लस ही सुरक्षित आणि प्रभावी ठरेल ही आमची प्राथमिकता असणार आहे.
कोरोना व्हायरसच्या दरम्यान आज ग्रुप ऑफ मिनिस्टर्स यांची 22 वी बैठक पार पडली होती. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी असे म्हटले ही, भारताचा रिकव्हरी रेट हा जगात सर्वाधिक म्हणजेच 95.46 टक्के आहे. तसेच हर्षवर्धन यांनी असे म्हटले होते की, सहा-सात महिन्यात जवळपास 30 कोटी लोकांना लस देण्यास आम्ही सक्षम असू.
दुसऱ्या बाजूला WHO चे महानिर्देशक टॅड्रॉस अॅडहेनॉम घेबरेयेसस यांनी असे म्हटले की, या महारोगावरील लस कॉवॅक्सचे जवळजवळ 3 लाख अरब डोस खरेदी करण्यासाठी तयारी करण्यात आली आहे. संघटनेचे उद्देश ही लस गरजू देशांमध्ये एकसमान पद्धतीने उपलब्ध करुन द्यावी. तसेच मार्च 2021 पर्यंत ही उपलब्ध करुन दिली जाईल असा विश्वास डब्लूएचओ यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.