पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना संसर्गाचा आढावा घेण्यासाठी सर्व पक्षीय नेत्यांची बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये कोरोना लसीसंदर्भातील महत्वाची माहिती दिली गेली. यामध्ये मोदींनी करोनाची लस कधी उपलब्ध होणार, ती सर्वात आधी कोणाला दिली जाणार याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. एकीकडे करोनाची लस निर्मिती सुरु असली तरी करोनाबाबत बेजबाबदार राहणं महागात पडेल असं मतही मोदींनी व्यक्त केले आहे.
या बैठकीनंतर मोदी म्हणाले, “पुढच्या काही आठवड्यात कोरोनाची लस तयार होईल, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. लस तयार झाल्याची समजताचं यामध्ये आरोग्य कर्मचारी, पोलीस, डॉक्टर्स आणि ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य दिलं जाईल”. सर्व राजकीय पक्षांनी आणि देशातील नागरिकांनी या लसीकरणासंदर्भात सहकार्य करावं असंही मोदींनी यावेेळी म्हटलं आहे. तसेच पुढील काही आठवड्यांमध्ये लस उपलब्ध होईल असे मोदींनी आपल्या भाषणामध्ये सांगितले आहे. लस उपलब्ध झाली तरीही सोशल डिस्टनसिंग आणि मास्कचा वापर करणे हे महत्त्वाचे आहे. कोरोना संकट पूर्णपणे टळेपर्यंत सगळ्यांना सावधान राहणे गरजेचे आहे. असंही मोदींनी म्हंटले आहे. तसेच सर्व सामान्यांना तुमचे काही सल्ले असल्यास आम्हाला लेखी पाठवा त्यावर विचार केला जाईल, असं आश्वासनही दिलं आहे.