कोरोना लस डॉक्टर आणि पोलीसांनाचं प्रथम मिळणार: राजेश टोपे

0

जगभरात विविध कंपन्या कोरोना लसीच्या शोधत आहेत. तर दुसरीकडे कोरोना लस पहिल्यांदा कोणाला देणार याबाबत चर्चा सुरू आहेत. महाराष्ट्रात प्रथम लस देण्यात येणाऱ्यांची यादी तयार करण्याचं काम सूरु झालं आहे. पोलीस, डॉक्टर आणि वृद्ध नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

महाराष्ट्रात सर्वात आधी ज्यांना लस द्यायची आहे त्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे या यादीत नाव यावे म्हणून राजकीय नेते आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी फिल्डिंग लावत आहेत असाही आरोप होत आहे. या सर्व गोष्टींवर भाष्य करत डॉक्टर, पोलीसांना लस देणार असही त्यांनी म्हंटले आहे. हि माहिती राजेश टोपे यांनी पदवीधर निवडणूकिसाठी मतदान हक्क बजावल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितली आहे.

राज्य सरकारच्या निकषानुसार राजकारणी पहिल्या टप्प्यात येत नाहीत. मात्र, आम्ही रोज लोकांना भेटण्यासाठी पूढे असल्याने, त्यांना जास्त धोका आहे. त्यामुळे आम्ही देखील फ्रँटलाईन कर्मचाऱ्यांमध्ये येतो. सोबत आमच्या कुटुंबाचा देखील यामध्ये समावेश करावा, अशी माहिती मुंबई महानगर पालिका अधिकाऱ्याने दिली. कोरोनाच्या लसीवर केंद्र व राज्य शासनाचे नियंत्रण असणार आहे. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे कोरोना लसीकरण केले जाणार आहे.