कोरोनाची दुसरी लाट आता अोसरत आलेली आहे. परंतू या दुसर्या लाटेने आपली कधीही भरुन न निघणारी एवडी प्रचंड हानी केली. अपुर्या आरोग्यसुविधा हे यासाठी कारणीभूत ठरले असले, तरि चाचण्यांचे ऊशिराने होणारे निदान हेसुद्धा यासाठी महत्वाचे कारण ठरले आहे. त्यामुळेच आता थेट व्हॉट्सअपवरुनच Xray-setu या अॅपच्या सहाय्याने काही मिनीटांच्या काळात कोरोनाचे निदान होणार असल्याचे तंत्रज्ञान विकसीत करण्यात आले आहे.
संभाव्य धोका वर्तवण्यात आलेल्या तीसर्या लाटेच्या पार्श्वभूमिवर Xray-setu महत्वाची भूमिका निभावणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी आणि डॉक्टरांनी सांगीतले आहे. ईंडीयन ईंन्सीटीट्युट अॉफ सायन्स द्वारा स्थापीन एनजीअो (IISC), विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग आणि Artpark( एअाय आणि रोबोटीक्स टेक्नॉलॉजी पार्क) यांच्या संयुक्त विद्यामाने हे अॅप विकसीत करण्यात आले आहे. जे व्हॉट्सअपवर चालवले जाणार आहे.
गेल्या आठवड्याभरापासून ही सुविधा वापरली जात असून ५०० पेक्षा अधिक डॉक्टरांनी याचा वापर केला आहे. येत्या १५ दिवसांत १०००० डॉक्टरांचे जाळे निर्माण करण्याच्या विचाराधीन असल्याचे Artpark चे मुख्य कार्यकारी अधिकारी उमाकांत सोनी यांनी सांगीतले.
कसे वापरायचे?
सर्वप्रथम https://www.xraysetu.com यावर जाऊन डॉक्टरांना भेट द्या. त्यानंतर Try the Free X-raySetu Beta’ बटणावर क्लिक करा. आता प्लॅटफॉर्म आपल्याला दुसर्या पृष्ठावर नेईल जेथे आपण वेब किंवा स्मार्टफोन अॅपद्वारे व्हॉट्सअॅप-आधारित चॅटबॉट निवडू शकता.
त्याठिकाणी डॉक्टरांना XraySetu ची सेवा सुरू करण्यासाठी +91 8046163838 या क्रमांकावर व्हाट्सअॅप मेसेज पाठविण्यास सांगेल.
यानंतर, रुग्णाला XraySetu फोटोवर क्लिक करावी लागेल आणि त्यानंतर काही मिनिटांत, दोन पानांचा अहवाल उपलब्ध होईल.
एखाद्या व्यक्तीला करोना असल्यास त्याला त्वरित डॉक्टरांच्या सल्ल्याची गरज असल्याचे या अहवालात सांगितले जाईल.