“महाराष्ट्रात कोरोनाचा नवा स्ट्रेन, विधिमंडळ अधिवेशन कोरोना”, काय म्हणाले संदिप देशपांडे?

8

मनसेचे नेते संदिप देशपांडे हे कायम आपल्या आक्रमक विधानांमुळे चर्चेत असतात. कोरोनाच्या नव्याने वाढणार्‍या रुग्णसंख्येवरुन त्यांनी महाविकासआघाडी सरकारवर निशाना साधला आहे. नेमका महाराष्ट्रातच कोरोनाचा कसा काय पसरतोय, शिवाय राष्ट्रवादींच्याच नेत्यांना कोरोना का होतोय? असे सवाल ऊपस्थित करत नव्याने वाढणार्‍या रुग्णसंख्येवर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

अचानकच कोरोनाचे रुग्ण आढळून येण्याच्या प्रमाणात प्रचंड वाढ होते आहे. यंदा विदर्भातून या रुग्णवाढीस सुरुवात झाली आहे. तसेच महाविकासआघाडी सरकारमधील नेते एकामागोमाग एक पॉझीटीव्ह येतायत. यावरच संदिप देशपांडे यांनी ट्वीट करत राज्यबसरकारवर टीका केली आहे. सावधान सध्या कोरोनाचा नविन स्ट्रेन आपल्या महाराष्ट्रात आला आहे. ज्याचे नाव विधिमंडळ अधिवेशन कोरोना असे आहे. या नविन स्ट्रेनचा शरीरावर कमी आणि स्वातंत्र्यावर जास्त परिणाम करतो. असे ट्वीट करत त्यांनी महाविकासआघाडी सरकारवर निशाना साधला आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, एकनाथ खडसे यांना एकापाठोपाठ एक कोरोनाची लागन झाली आहे. संदिप देशप‍ांडे यांनी यावर शंका व्यक्त करत. दिल्लीत शेतकर्‍यांचे आंदोलन सुरु आहे. मागील काळात राज्यात ग्रामपंचायत निवडणुका झाल्यात, नेत्यांच्या सभा, मोर्चे झालेत तेव्हा कोरोना पसरला नाही. आत्ताच मात्र का पसरतो आहे. अधिवेशन‍ाच्या काळात सरकारला सामान्य माणसांच्या प्रश्नांची ऊत्तरे द्यायची नाहीत. म्हणून ही सरकारची नाटकं असल्याचं ते बोलले.

संदिप देशपांडे यांनी आपल्या ट्वीटमध्ये तळटीपसुद्धा दिली आहे. माझ्या वक्तव्य‍ानंतर राष्ट्रवादी समर्थक माझ्यावर टीका करतीन. परंतू जे सत्य आहे तेच मी मांडलं आहे. असेसुद्धा ते यावेळी म्हणाले.