साऊथ सुपरस्टार चिरंजीवी यांना कोरोनाची लागण

3

   साऊथचे अभिनेते चिरंजीवी यांना कोरोनाची लागण झाली आहे. चिरंजीवी यांनी एका ट्विटद्वारे कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले आहे. हि पोस्ट पाहून त्यांचे चाहते तब्येतीसाठी प्रार्थना करत आहेत. सोशल मिडियावर #chiranjeevi ट्रेंड सुरू आहे. अनेकांनी काळजी घ्या असे ट्विटदेखील केले आहेत. नुकतेचं अभिनेते  चिरंजीवी आणि नागार्जुन यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची भेट घेतली होते. त्याचे फोटोही सोशल मिडियावर शेअर केले होते.

  चिरंजीवी हे आगामी ‘आचार्य’ चित्रपटामुळे सध्या खूप चर्चेत आहेत. चिरंजीवी यांनी ट्विटमध्ये सांगितले की, आगामी ‘आचार्य’ चित्रपटापूर्वी त्यांनी कोरोना चाचणी केली. या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी. सध्या मी घरीच क्वारंटाईन झालो आहे. असे त्यांनी सांगितले आहे. त्यांना कोणतीही लक्षणे नसून त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे. आचार्य या चित्रपटात चिरंजीवी दोन भूमिका साकारणार आहेत. चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे परंतु आता या चित्रपटाचे चित्रीकरण पुढे ढकलण्यात आले आहे.