अलप्पुझा जिल्ह्यातील सरतमोन या तरुणाशी तिचा विवाह ठरला होता. सरतमोन परदेशात कामाला असून विवाहासाठी तो केरळमध्ये आला होता. तिथून आल्यावर तो विलगीकरण कक्षात होता.
केरळच्या एका जोडप्याने कोरोना वॉर्डातच साताजन्माच्या गाठी बांधल्या आहेत. तरुणीने पीपीई किट घालून कोरोना संक्रमित तरुणासोबत लग्न केल्याची अनोखी घटना केरळच्या एका रुग्णालयात घडली आहे.
सरतमोन-अभिरामी असे या दांपत्याचे नाव आहे. तरुणी थेक्कन आर्यद येथील निवासी आहे. 25 एप्रिलला त्यांचा विवाह होता मात्र नवरदेवासह त्याच्या आईला कोरोनाची लागण झाल्याने अखेर विवाह पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.