औरंगाबादच्या शांततेला धोका पोहचू शकतो; पोलिसांनी व्यक्त केली भीती ‘हे’ आहे कारण

15

स्मार्ट सिटीच्या कॅम्पेनिंग अंतर्गत संभाजीनगर नावाचा उल्लेख केल्यामुळे औरंगाबादेत वादाला सुरुवात झाली होती. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहराचं पूर्वीचं नाव असलेलं खडकी, तसेच औरंगाबादचे फलक लावण्यात आले आहेत. त्यामध्ये आय लव्ह औरंगाबाद, लव्ह प्रतिष्ठान, लव्ह खडकी असे डिस्प्ले लावून सेल्फी पॉईंट तयार करण्यात आले आहेत.

कुठे ‘लव्ह औरंगाबाद’, तर कुठे ‘सुपर संभाजीनगर’ असे फलक औरंगाबादेत लावण्यात आले आहेत. पण आता याच फलकावरुन औरंगाबाद शहरातील शांततेला धोका निर्माण होण्याची भीती औरंगाबाद पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे. यासंदर्भात सिडको पोलिसांनी गोपनीय अहवाल तयार केला आहे. सदरील फलकामुळे औरंगाबाद शहराची एकता भंग पावण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिवसेना आमदार आणि जिल्हाप्रमुख अंबादास दानवे दानवे यांच्या मातृभूमी प्रतिष्ठानने शहरातील टीव्ही सेंटर भागातील संभाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ “सुपर संभाजीनगर” फलक लावण्यात आला आहे. या फलकामुळे शहरातली शांततेला धोका निर्माण होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.