रा.स्व.संघ समर्थ भारत योजनेद्वारे पुणे महानगरपालिका, रा.स्व.संघ जनकल्याण समिती आणि विवेक व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना आपदेचा सामना करण्यासाठी पुण्यात विनामूल्य कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे.
हे सेंटर सुरू करण्यापुर्वी महापालिका अधिकारी,स्थानिक लोकप्रतिनिधी,जनकल्याण समिती व विवेक व्यासपीठ यांच्या प्रतिनिधी सोबत तेथील विविध व्यवस्थेच्या तयारीची पाहणी केली.
पी.पी.सी.आर ( Pune Platform for covid responce), सह्याद्री हॉस्पिटल, लोहिया परिवाराचे श्री मुकुंद भवन ट्रस्ट, लक्ष्मीनारायण देवस्थान ट्रस्ट, परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशन आणि महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था यांच्या सहयोगाने हे कोविड केअर सेंटर गुढीपाडव्यापासून सुरू होत आहे.
कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या कर्वे नगर येथील बाया कर्वे वस्तीगृहात सुरु करण्यात आलेल्या या कोविड केअर सेंटरमध्ये ४५० बेडची सुविधा करण्यात आली आहे. एका खोलीत तीन रुग्णांची व्यवस्था असेल.
कोणतीही लक्षणे नसलेली पण कोरोना अहवाल पॉझीटीव्ह असलेले रुग्ण ज्यांना विलगीकरण आवश्यक आहे आणि घरात सुविधा नाही. अशा रुग्णांना हे कोविड केअर सेंटर वरदान ठरणार आहे. पुणे महापालिकेच्या वतीने आवश्यकता भासल्यास रुग्णांना पुढे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.