कोरोनाच्या संकटात रुग्णांच्या मदतीसाठी त्यांना आधार देणारे वैशिष्ट्यपूर्ण व नावीन्यपूर्ण असे ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था असलेले कोविड केअर सेंटर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली भुजबळ नॉलेज सिटी व त्यांच्या सहकाऱ्यांनी नाशिकमध्ये तयार केले आहे.
नाशिकमध्ये भुजबळ नॉलेज सिटीने तयार केलेल्या कोविड सेंटरचा आदर्श घेऊन राज्यात इतर ठिकाणी देखील शक्य असेल तेवढे कोविड सेंटर निर्माण करा, असे आवाहन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यातील सहकारी आणि स्वयंसेवी विविध संस्थांना केलं.
भुजबळांनी हाती घेतलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य असा असून हे कोविड केअर सेंटर राज्यातील इतर संस्थाना कोरोनाच्या लढाईत काम करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास पवारांनी व्यक्त केला.